नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्ली पुन्हा हादरली आहे. देशभरात सध्या श्रद्धा हत्याकांड गाजत आहे. आरोपी आफताबने श्रद्धा वालकर हिची हत्या करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकले. आता अशाच प्रकारचे आणखी एक हत्याकांड उघड झाले आहे. या गुन्ह्यात आई आणि मुलगा हे दररोज मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गेल्या मे महिन्यात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीतील पांडव नगर येथील रामलीला मैदान आणि नाल्यात अनेक मानवी अवयव सापडल्याप्रकरणी आई आणि मुलाला अटक केली होती. पूनम आणि दीपक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मानवी अवयव अंजन दास यांचे होते. खरं तर, आरोपी पूनम ही अंजन दासची पत्नी आहे, तर दीपक सावत्र मुलगा आहे. दोघांवर अंजनच्या हत्येचा आरोप आहे.
अंजनचे अनेक महिलांशी अवैध संबंध
अंजन दासचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते. त्याला दारूमध्ये नशेच्या गोळ्या मिसळून प्यायला लावले, त्यानंतर चाकूने मृतदेहाचे तुकडे करून अनेक ठिकाणी फेकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पूनमने अनेक लग्न केली होती.
गेल्या ३० मे रोजी पोलिसांच्या तपासात मानवी अवयव सापडले होते. या प्रकरणी पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते, ज्याच्या आधारे सहा महिन्यांच्या तपासानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आता पोलिस अंजन दासचे डीएनए प्रोफाइलिंग करणार आहेत.
सुनेवर घाणेरडी नजर ठेवायची
मिळालेल्या माहितीनुसार, अंजन दास यांना त्यांचा सावत्र मुलगा दीपकच्या पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय होता. दीपक हा पूनमचा पहिला नवरा कल्लूचा मुलगा आहे. पत्नीवर चुकीची नजर ठेवल्यामुळे दीपकला त्याचा सावत्र वडील अंजन दासचा खूप राग होता.
हे प्रकरण दिल्लीतील छतरपूर भागातील श्रद्धा खून प्रकरणासारखे आहे. तसेच दोन्ही हत्या मे महिन्यात घडल्या हा निव्वळ योगायोग आहे. छतरपूर भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आफताबवर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. यानंतर मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून तो अनेक महिने रात्री लपवून ठेवले. त्यानंतर त्याने हे तुकडे वेगवेगळ्या जंगलात आणि ठिकाणी फेकले. सध्या आफताब तुरुंगात असून याप्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
https://twitter.com/ANI/status/1597111193373532160?s=20&t=ippb6jEbWVeomm6ta3sI4w
Delhi Murder Case like Shraddha Investigation
Crime Police