नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्येंद्र जैन जेलमध्ये मसाज करुन घेताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर पडून वाचताना दिसत आहेत तर एक माणूस त्याच्या पायाला मालिश करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. याप्रकरणी भाजपने आम आदमी पार्टीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
तिहार तुरुंगात बंदिस्त असलेले मंत्री सत्येंद्र जैन हे तुरुंगात ऐषोआरामी जीवन जगत असल्याचे फुटेजवरून दिसून येत आहे. व्हायरल फुटेजवर तिहार तुरुंगातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व्हिडिओबाबत न्यायालयात पोहोचले आहे. हे फुटेज समोर आल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात अनेक घडामोड घडत आहेत.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन तुरुंगात आपल्या बॅरेकमध्ये मसाजचा आनंद घेताना दिसत आहेत. तुरुंगाच्या कोठडीत एक अज्ञात व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसत आहे. याबाबत ईडीने या संपूर्ण प्रकरणाची कोर्टात तक्रार केली असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज कोर्टाकडे सुपूर्द केले आहेत. जैन हे तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहेत. जैन यांना सुविधा दिल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकांसह चार तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 35 हून अधिक तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तुरुंग बदलण्यात आले आहेत.
आम आदमी पार्टी (आप) नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांखाली अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापूर्वी, एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, २००२ अंतर्गत जैन यांच्या कुटुंबातील आणि कंपन्यांच्या ४.८१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता.
जैन यांच्यावर दिल्लीत अनेक शेल कंपन्या सुरू केल्याचा किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याने कोलकातास्थित तीन हवाला ऑपरेटर्सच्या ५४ शेल कंपन्यांच्या माध्यमातून १६.३९ कोटी रुपयांचा काळा पैसाही लाँडर केला. प्रयास, इंडो आणि अकिंचन नावाच्या कंपन्यांमध्ये जैन यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स होते. रिपोर्ट्सनुसार, २०१५ मध्ये केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर जैन यांचे सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीला ट्रान्सफर करण्यात आले होते. अटकेनंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ईडीने जैन यांना मनी लाँड्रिंगची कागदपत्रे दाखवून प्रश्न विचारले असता त्यांनी कोरोनामुळे स्मरणशक्ती गमावल्याचा दावा केला.
Arvind Kejriwal has reduced Tihar to a massage parlour. His jailed minister Satyendra Jain would get a masseur, who would, in violation of all jail rules, indulge the inmate, because of his proximity to the Delhi CM. Delhi Govt manages Tihar.
ये भ्रष्टाचारी राजनीति बदलने आए थे। pic.twitter.com/8NgUlqDGFE
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) November 19, 2022
Delhi Minister Jain Tihar Jail Massage Video Viral
AAP Arvind Kejriwal Satyendra Jain