नवी दिल्ली – दिवसाकाठी तब्बल २५ हजाराहून अधिक नवे कोरोना बाधित होत असल्याने अखेर दिल्लीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्य मंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केला आहे. उद्यापासून येत्या २६ एप्रिल पर्यंत सहा दिवसांचा हा कडक लॉकडाऊन असेल. आज रात्री १ वाजेपासून लॉकडाऊनला प्रारंभ होणार असून तो २६ एप्रिलला सकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. वाढते बाधित पाहता आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. म्हणून हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या आगामी ६ दिवसात दिल्लीत भक्कम अशा आरोग्य सुविधा आम्ही निर्माण करणार आहोत. ज्या लॉकडाऊनंतर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील, असेही केजरीवाल म्हणाले. लॉकडाऊन लावण्याचा मनस्थितीत आम्ही नव्हतो. मात्र, वाढत्या संख्येपुढे आम्ही हतबल झालो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी केजरावील यांनी दिल्लीचे नायब राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केजरीवाल यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहिर केला आहे. त्यामुळे दुसरी लाट येताच भारतात कडक लॉकडाऊन लावणारे दिल्ली हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
https://twitter.com/ANI/status/1384037278478045197