नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहानसहान कारणांवरून होणारे वाददेखील न्यायालयात पोहचत असतात. यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढून न्यायपालिकेवरील ताण वाढतो. बरेचदा अगदी क्षुल्लकसे भांडणसुद्धा विनाकारण न्यायालयात गेल्याने नेमकी काय शिक्षा करावी, किती दंड ठोठवावा, असा प्रश्न न्यायाधीशांनाही पडतो. अशा एका अत्यंत लहानशा वादात सहभागी असलेल्या दोन कुटुंबांना न्यायालयाने प्रत्येकी २०० झाडे लावण्याची शिक्षा दिली असून या झाडांची देखभालदेखील करायची आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात आलेल्या प्रकरणातील दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध एफआयआर केली आहे. त्यातील पहिल्या एफआयआरमधील तक्रारदारानुसार, हे प्रकरण ४ मार्च २०१७ रोजीचे आहे. जेव्हा एका कुटुंबातील तीन सदस्य त्यांच्या घरी आले आणि त्यांना एका राजकीय पक्षाच्या योजनेअंतर्गत ब्लँकेट मिळवून देण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रांची मागणी केली. फिर्यादीने तिघांना सांगितले की, ते दुसऱ्या राजकीय पक्षाचे समर्थक आहेत, ज्यामुळे शाब्दिक वाद आणि नंतर हाणामारी झाली.
दुसऱ्या एफआयआरमध्ये विरुद्ध पक्षाने असा आरोप केला की, ते ब्लँकेट वाटपाच्या उद्देशाने ओळखपत्र गोळा करत असताना दुसऱ्या कुटुंबाने त्यांच्याशी भांडण केले आणि त्यांना मारहाण केली. जानेवारीमध्ये दोन्ही पक्षकारांमधील भांडण एकमेकांच्या सहमतीने मिटवले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देताना दोन्ही कुटुंबांना त्यांच्या भागात प्रत्येकी २०० झाडे लावण्याचे निर्देश दिले.
एफआयआर आणि कार्यवाही रद्द
न्यायालयाने स्वेच्छेने दुखापत, घरामध्ये घुसखोरी, दुखापत, हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केल्याच्या आरोपाखाली नोंदवलेल्या दोन फौजदारी खटल्यांमधील