नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील सत्तेच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या वादात आता नवा अंक सुरू झाला आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटायला बोलावले आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि १० आमदारांसह एलजी हाऊसमध्ये येऊन भेटण्यास सांगितले. मात्र, मला अन्य कुठल्या तरी दिवशी भेटायला आवडेल, अशी प्रतिक्रीया केजरीवाल यांनी दिली आहे. त्यामुळे आधीच गाजत असलेला या दोघांमधील वाद आता कुठली परिसीमा गाठणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्यात बऱ्याच दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र दिले की, त्यांनी भेटण्यासाठी शुक्रवारी, २७ जानेवारी रोजी यावे. केजरीवाल यांनी त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि १० आमदारांसह एलजी हाऊसमध्ये येऊन भेटावे, असे सक्सेना यांनी पत्रात नमूद केले आहे.
दिल्लीच्या नायब राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. सरकारी शिक्षकांना फिनलंडला प्रशिक्षणासाठी जाण्यापासून व्ही के सक्सेना यांनी रोखले आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाच्या आमदारांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याविरोधात निदर्शने केली होती.
२० जानेवारी रोजी केजरीवाल यांनी एका पत्रात लिहिले होते की, “जर पूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि दिल्लीचे सर्व आमदार तुमच्या दारात उभे होते, तर साहजिकच त्यांच्याशी संबंधित काही मोठी समस्या आली होती. राज्य हवे असते तर पाच मिनिटे बाहेर येऊन आम्हाला भेटता आले असते. केजरीवाल यांनी पत्रात पुढे लिहिले की, तुम्ही आम्हाला भेटला नाही म्हणून संपूर्ण राज्यातील जनतेला वाईट वाटले. दिल्लीतील जनतेचा अपमान झाला आहे.” यासोबतच केजरीवाल यांनी आपल्या पत्रात दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले आहे.
नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांच्या पत्रात दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे. दिल्लीच्या जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा ऐतिहासिक बहुमत दिले आहे. आमचे सरकार जनतेच्या दृष्टीने चांगले काम करत आहे, असे केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.
Delhi Government CM and LG Meet Issue