नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी बिघडली आहे, असा सातत्याने आरोप केला जातो. या आरोपाचा प्रत्यय वारंवार येताना दिसून येतो, गेल्या काही वर्षांमध्ये समाजात तरुणाईमध्ये विकृत मनोवृत्ती वाढल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी मुंबईत एका विकृत तरुणांनी मध्यरात्रीच्या वेळी लोकलमध्ये डब्यात एकटीच तरुणी पाहून हस्तमैथुन यासारखे अश्लील कृत्य केले होते. असाच प्रकार नुकताच दिल्ली शहरात रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर घडल्याने खळबळ उडाली आहे. मुलींच्या पीजी होस्टेलबाहेर एका विकृत तरुणाने असे अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या या किळसवाण्या कृत्या व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या वाईट प्रकाराबाबत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी
गेल्या काही दिवसात पोलिसांचा कोणालाही धाक उरला नाही, असे दिल्ली शहरातील घटनांवरून दिसून येते. स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर दोन व्हिडिओ शेअर केले. यात एक तरुण रात्रीच्या वेळी मुलीच्या पीजी होस्टेलबाहेर उभा राहून हस्तमैथुन सारखे अश्लील कृत्य करताना दिसत आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, आम्हाला दोन तक्रारी मिळाल्या की एक मुलगा रात्री मुलींच्या पीजी होस्टेलच्या बाहेर उभा राहून अश्लील कृत्य करतो. दोन्ही व्हिडिओ एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांना हजेरीचे समन्स बजावले असून कारवाईचा अहवाल मागवला. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
संतप्त प्रतिक्रिया
एका रिपोर्टनुसार, दिल्ली महिला आयोगाकडे एक तक्रार करण्यात आली होती. त्यात मध्यरात्री एक तरूण पीजी होस्टेलबाहेर उभा राहिला आणि बाल्कनीत उभ्या असलेल्या काही मुलींकडे एकटक पाहत असताना त्याने अश्लील कृत्य केले. दिल्ली पोलिसांना या घटनेबाबत कृती अहवाल (एटीआर) मागणारी नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र दिल्ली पोलिसांना उत्तर देण्यात अपयश आले. या प्रकरणी मॉरिसनगरच्या एसएचओला दिल्ली महिला आयोगासमोर एटीआर रिपोर्टसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संप्तत प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भातील व्हिडिओ पाहून अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. तसेच पोलीस रात्रीच्या वेळी ग्रस्त घालत नाहीत का? असा सवाल ही काही जणांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/SwatiJaiHind/status/1673298558714535938?s=20