विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशाच्या राजधानीत कोरोनाच्या पाचव्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राजधानीत कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यातून असे स्पष्ट होते की, सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना नागरिक कोरोना निर्बंध पाळत नाहीत. त्यामुळे संसर्गाची पाचवी लाट येणार असून ही लाट किती प्रभावी असेल याबाबत काहीही सांगण्यास वैज्ञानिकांनी असमर्थता दर्शविली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, दिल्लीतील कोरोना तपासणी कधीही योग्य आलेखात दिसत नाही. खूप सर्वेक्षण व छाननी अचानक होते, मग ते एका दिवसात किंवा दोन दिवसांत आलेख ५० टक्क्यांपर्यंत खाली येतो. काही दिवसांनी आलेख पुन्हा वर जातो.
महामारीचे तज्ज्ञ दिव्येंदु त्यागी म्हणतात की, गेल्या वर्षी दिल्लीत कोरोना संसर्गाच्या तीन लाटा आल्या. प्रत्येक लाट पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक आणि प्रभावी देखील होती. गेल्या एप्रिलपासून कर्फ्यूसारखी परिस्थिती सुरू आहे, परंतु दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात बघितले तर स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे काहीच नाही. नागरिक बाजारात गर्दी करताना दिसू लागले आहेत.
दिल्लीतील वैद्यकीय महाविद्यालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुनीर अंशु म्हणतात की, आतापर्यंतच्या अभ्यासातून असे दिसते, ब्रिटनच्या नव्या विषाणूमुळे लोकांमध्ये विकसित झालेल्या इम्युनिटी देखील कमी होऊ लागल्या आहेत.
काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिल्लीतील कोरोना संक्रमणाची पुढील लाट रोखता येईल. तथापि, ही जबाबदारी सरकार आणि जनतेची आहे. कोविड नियमांचे पालन नागरिकांनी केले तर निश्चितपणे कोरोना संसर्गास आळा बसेल. तसेच सरकारांनीही कोविड दक्षतेचे नियम जनहितार्थ कठोर केले तर त्याचा चांगला परिणामही होईल.
दिल्लीत कोरोना विषाणूच्या चार लाटांचा सामना करत असून सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत सुमारे २० हजारांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे. तर अशासकीय आकडेवारी यापेक्षा बरीच जास्त असल्याचे म्हटले आहे.