नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजधानी दिल्लीहून हरिद्वार आता अवघ्या ९० मिनिटांमध्ये गाठता येणार आहे. दिल्ली ते डेहराडून दरम्यान बांधण्यात येत असलेला नवीन एक्स्प्रेस वे या वर्षी डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. त्यानंतर दिल्ली ते डेहराडून हे अंतर दोन तासांत कापले जाईल. दिल्ली ते डेहराडून दरम्यान बांधल्या जाणाऱ्या या २१२ किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेची किंमत १२ हजार कोटी रुपये आहे. तशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘आता फक्त दोन तासात दिल्लीहून डेहराडूनला पोहोचू शकतील’. त्याचबरोबर दिल्ली ते हरिद्वार हे अंतरही ९० मिनिटांत पूर्ण होणार आहे. दिल्ली डेहराडून एक्स्प्रेस वेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेचे 60-70 टक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. या सहा पदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे हवाई सर्वेक्षण त्यांनी केले.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1644026110597013504?s=20
दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवे चार विभागांमध्ये विभागलेला आहे. तो दिल्लीतील अक्षरधाम मंदिरापासून सुरू होईल आणि दिल्लीच्या शास्त्री पार्क, खजुरी खास, मंडोला, बागपत, शामली, सहारनपूर, उत्तर प्रदेशमधील खेकरा येथील ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेमार्गे डेहराडूनला जाईल. गणेशपूर ते डेहराडून दरम्यानच्या भागात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी १२ किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. महामार्गावर सहा अंडरपास बांधण्यात आले आहेत. विशेष हत्ती कॉरिडॉर आणि दोन मोठे पूल आणि 13 छोटे पूलही बांधण्यात आले आहेत.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1643940622552940544?s=20
Delhi Dehradun Expressway Haridwar Nitin Gadkari