नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शिष्य तथा अनुयायी म्हणून ओळखले केले जाणारे माजी सनदी अधिकारी व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर आपण अत्यंत साध्या घरात राहून असे सांगणारे, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बंगल्याचे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या संदर्भात भाजपने मोठे रान उठवले असून या बंगला नूतनीकरण प्रकरणामुळे केजरीवाल सध्या चांगलीच अडचणीत आले आहेत, असे दिसून येते.
दिल्ली सरकारने करदात्यांच्या खिशातील ४५ कोटी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केल्याचा आरोप करीत दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर बिधुरी यांनी केजरीवाल यांना आलिशान जीवन जगणारा राजा संबोधले आहे. रामवीर सिंह म्हणाले की, पुर्वी केजरीवाल म्हणायचे, आमचे सरकार आल्यावर मी दोन खोल्यांच्या घरात राहील. मला कोणतीही सुरक्षा नसेल आणि मी आलिशान कार चालवणार नाही. परंतु आता त्यांनी घराच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
विशेष म्हणजे त्याला राजवाड्याचे स्वरूप दिले. आज ते घरून निघतात, तेव्हा २८ वाहनांचा ताफा त्यांच्या बरोबर फिरतो. तसेच पंजाब पोलीसही बंदोबस्तात आहेत. सध्या त्यांच्याकडे ५० लाखांहून अधिक किमतीची कार आहे, असा आरोपही रामवीर सिंह बिधुरी यांनी केला आहे. तसेच दिल्ली कोविडशी लढत होती, तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या घराच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करीत होते. या व्हिएतनाम येथून आणण्यात आलेल्या एक एका पडदयाची किंमत ८ लाख रुपये आहे, मार्बलसाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला असून गालिचे लाखो रुपये किंमतीचे आहेत. घराच्या नूतनीकरणावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असा आरोप भाजपने केला आहे.
कोरोना महामारी में फ़र्ज़ी फकीर की रईसी-
Central Vista: 23000 Crore
PM निवास: 500 Cr
मौजूदा निवास की मरम्मत: 90 Cr
जहाज: 8400 Cr
Car: 12 Cr
Pen: 1.25 Lakh
Suit: 10 Lakh
Sunglass: 1.6 Lakhजब देश कोरोना से जूझ रहा था PM Modi Bengal में रैली कर Corona फैला रहे थे
–@SanjayAzadSln pic.twitter.com/0yx5YG5ues
— AAP (@AamAadmiParty) April 26, 2023
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी केजरीवाल यांचा बचाव केला आहे. ते म्हणाले की, हे सरकारी घर आहे, ती अरविंद केजरीवाल यांची मालमत्ता नाही. केजरीवाल राहतात त्या घरात १९४२ मध्ये बांधले गेले. घराच्या आतील छतापासून बेडरूमपर्यंत पाणी टपकत आहे. या उलट पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थान बांधले जात असून त्याचा अंदाजे खर्च ५०० कोटी असल्याचेही त्यांनी म्हटले केले.
Pulwama, Adani Scam जैसे देश के गंभीर, बड़े मुद्दों से ध्यान भटका रही BJP
? 80 साल पुराना 1942 में बना हुआ घर है
? छत गिरने की एक नहीं तीन वारदात हुईं?LG निवास की मरम्मत में ₹15 Cr
?Gujarat CM का उड़नघटोला ₹191 Cr
?PM Modi के घर को ठीक करने में ₹500 Cr—@SanjayAzadSln pic.twitter.com/StrFWBibgi
— AAP (@AamAadmiParty) April 26, 2023
Delhi CM Arvind Kejriwal Bungalow Renovation Allegation