पुणे – आधुनिक काळात मोबाईल ही उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक वस्तू बनली आहे, त्यामुळे आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. वर्क फॉर्म होम म्हणजे घरी काम करणाऱ्यांपासून ते ऑफिसला जाणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. अनेक जण विविध प्रकारची कामे मोबाईलवर करतात, त्यापैकी एक म्हणजे ऑनलाइन बँकिंग होय.
बहुतांश नागरिक पैशांचे व्यवहारही मोबाईलवरूनच करतात. त्यामुळे एकमेकांना पैसे पाठवणे खूप सोपे झाले आहे, परंतु यामध्ये सायबर फसवणुकीचा धोकाही खूप वाढला आहे. अशी अनेक प्रकरणे रोजच समोर येत आहेत. म्हणूनच आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणते फेक अॅप डाऊनलोड करत असल्यास त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक बनले आहे कारण या फेक अॅप्सच्या माध्यमातूनही तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे होऊ शकते. त्यामुळे काही गोष्टी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्या लागतील, तर मग त्या गोष्टी जाणून घेऊ या…
बॅटरी लवकर डिस्चार्ज होते
एखादे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल, तर एखादे अॅप फेक असेल. बॅटरी वारंवार किंवा थोड्या वेळाने संपुष्टात येऊ लागते, तेव्हा मोबाइलमध्ये व्हायरस आला आहे काय ते चेक करावे.
अॅप रेटिंगकडे लक्ष द्या
कोणतेही अॅप डाउनलोड करताना ते अॅप किती जणांनी डाउनलोड केले आहे आणि किती वेळा डाउनलोड केले याची खात्री करा. त्याच वेळी अॅपबद्दल काही जण अनुभव देखील शेअर करतात. ते माहिती केल्यानंतर मगच अॅप डाउनलोड करा.
अॅपचे स्पेलिंग चेक करा
अॅप डाऊनलोड करताना एखाद्या अॅपच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असल्यास असे अॅप डाउनलोड करणे टाळावे.कोणत्याही शब्दाचे स्पेलिंग चुकीचे असल्यास हे अॅप बनावट असू शकते. त्यामुळे ते डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते.
बनावट ओळखा
अनेक अॅप्स बनावट आहेत आणि हे अॅप कॉपी करून तयार केले आहेत. त्यामुळे हे देखील डाउनलोड करणे टाळा, कारण हे अॅप तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.