मुंबई – संरक्षण मंत्रालयाने विविध पदांसाठी एकूण ४४४ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्या संदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे, त्यानुसार फील्ड दारुगोळा डेपोमधील ट्रेडडेमन मते, जेओएस, एमएस, एमटीएस आणि फायरमॅन या पदांसाठी आहे. संरक्षण मंत्रालयाने विविध रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे, त्यानुसार फील्ड वरिल दारुगोळा डेपोमधील ट्रेडमेन मॅन, जेओएस, एमएस, एमटीएस आणि फायरमॅन या पदांसाठी आहे. या सर्व पदांसाठी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सविस्तर जाहिरातीचा थेट लिंकही येथे देण्यात आला आहे.
पात्रता निकष असे
१) ट्रेडमेन मॅन : मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा समकक्ष शिक्षण.
२) जेओए : मान्यताप्राप्त मंडळाकडून १२ वी पास किंवा समकक्ष शिक्षण.
३) मटेरियल असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि संस्था कडून मटेरियल मॅनेजमेंटमध्ये समकक्ष किंवा डिप्लोमा.
४) एमटीएस: दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष शिक्षण.
५) फायरमॅन: दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.
६) ट्रेड मेन मेट : दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष.
महत्वाची माहिती
संरक्षण भरती मंत्रालयाच्या अधिकृत भरती अधिसूचनेत नमूद केले आहे की, अर्जासह पात्रता, निकष कोणत्याही माहितीसाठी www.indianarmy.nic.in आणि www.ncs.gov.in वर उपलब्ध आहे.
हे लक्षात ठेवा
निवड ही शारीरिक क्षमता आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. अर्जाची नोंदणी कोणत्याही प्रकारे रोजगाराची हमी देत नाही. उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र बरोबर सोबत न आणल्यास परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.