नवी दिल्ली – तामिळनाडूत हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेत माहिती दिली आहे. या दुर्घटने संरक्षण प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १३ जण ठार झाले आहेत. हा अपघात देशाची हानी करणारा ठरला आहे. कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना देश मुकला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत रावत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, असे सिंग यांनी स्पष्ट केले. बघा, राजनाथ सिंग यांचे राज्यसभेतील हे भाषण
https://twitter.com/rajnathsingh/status/1468827892503113729?s=20