धुळे – कोणताही देश त्याचा शेजारी बदलू शकत नाही. आम्ही भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत. कदापिही भारत मातेला झुकू देणार नाही, असा स्पष्ट ग्वाही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. आज ते दोंडाईचा दौऱ्यावर होते. तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संरक्षणमंत्री प्रथमच दोंडाईचा दौऱ्यावर आले होते. एकूण ४ पुतळ्यांचे त्यांनी अनावरण केले. त्यांचा हा दौरा तीन तासांचा होता.
राजनाथ यांचे दुपारी 12.40 मिनिटांनी दोंडाईचा येथे हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत दुपारी भरगच्च कार्यक्रम झाले. त्यात जनरल बिपिन रावत रस्त्याचे उदघाटन, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण, श्रीमंतराजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याचे अनावरण, शहीद अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याचे अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमांचा समावेश होता.
बघा राजनाथ सिंग यांच्या भाषणाचा व्हिडिओ
https://twitter.com/rajnathsingh/status/1474303547625783297?s=20