अक्षय कोठावदे, धुळे
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोंडाईचा तालुक्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. संरक्षणमंत्री प्रथमच दोंडाईचा दौऱ्यावर येत आहेत. एकूण ४ पुतळ्यांचे ते अनावरण करणार आहेत. तीन तास ते दौंडाईचामध्ये राहणार आहेत.
राजनाथ यांचे दुपारी 12.40 मिनिटांनी दोंडाईचा येथे हेलिपॅडवर आगमन होईल. त्यांच्या उपस्थितीत दुपारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जनरल बिपिन रावत रस्त्याचे उदघाटन, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण, श्रीमंतराजे दौलतसिंग रावल यांच्या पुतळ्याचे अनावरण, शहीद अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याचे अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमांचा समावेश आहे.
अमरिश पटेल यांचे शक्तीप्रदर्शन
दोंडाईचा येथील भाजप नेते अमरिश पटेल यांची नुकतीच विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पटेल हे येथे कार्यरत आहेत. पुन्हा आमदार होताच त्यांनी त्यांचे शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळेच त्यांनी थेट संरक्षण मंत्र्यांना दोंडाईचामध्ये आमंत्रित केले आहे.