अजय सोनवणे, मनमाड
स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने आज एका पाडसाला जीवदान मिळाले आहे. हरणांचे वास्तव्य असलेल्या येवला तालुक्यातील न्याहारखेडा येथे ६० फूट खोल विहिरीत हरणाचे पाडस पडले होते.
उन्हाच्या तीव्रतेने हरणांचे कळप अन्न-पाणीसाठी सर्वत्र भटकत असतात त्यातच मोकाट कुत्रे मागे लागून अनेक वेळेस हरणांचे लचके तोडतात. सकाळच्या सुमारास हरीण आपल्या पाडसासह फिरत होते. त्याचवेळी मोकाट कुत्रे मागे लागल्याने हरीण पळू लागले. त्यामगोमाग पाडस पळत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळेच पाडस थेट ६० फूट खोल विहिरीत जाऊन पडले. स्थानिक वन्यजीव पथकाच्या तरुणांना याची माहिती मिळाली. त्यांनी विहिरीत उतरून या पाडसाला बाहेर काढले आणि जीवदान दिले. मात्र जखमी झालेल्या या पडसाला चालता येत नसल्याने त्यांनी वनविभागाकडे उपचारासाठी दाखल केले आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा