मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ओटीटीवरील पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. गेहेरायियाँ नावाचा हा चित्रपट आहे. हा ट्रेलर प्रसिद्ध होताच तासाभरामध्ये लाखो व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. रजत कपूर आणि नसिरुद्दीन शाह हे सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. नात्यांची गुंतागुंत हे या चित्रपटाचे विशेष आहे. दोन बहिणी त्यांच्या त्यांच्या भोवती फिरणारे जीवन या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होईल. बघा या चित्रपटाचा ट्रेलर
https://twitter.com/taran_adarsh/status/1484095423757570048?s=20