पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रमाच बंद होणार असून यापुढे विद्यार्थ्यांना थेट बीएडलाच प्रवेश घ्यावा लागणार आहे, त्यामुळे डीएड पदवी यापुढे कोणालाही मिळणार नाही असे म्हटले जाते. आता अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा त्यासोबतच नव्या गोष्टींचा या इंटिग्रेटेड कोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक प्रशिक्षण शिकण्याची संधी मिळणार आहे. यापुढील काळात चार वर्षाचा इंटिग्रेटेड बी एड डिग्री कोर्स सुरु होणार असला तरी नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार आहेत, या संदर्भात शिक्षण खात्याकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही.
शिक्षण क्षेत्र हे अत्यंत प्रवित्र मानले जाते, शिक्षकांबद्दल केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे सर्व समाजाचा एक सकारात्मक दृष्टिकोन असतो, पूर्वी ३०ते ४० वर्षांपूर्वी सुमारे डीएड पास झाले की लगेच नोकरी मिळत असे. कालांतराने सन २००१ पासून ते २०१५ पर्यंत डिएड साठी प्रवेश घेणाऱ्यांची झुंबड उडत होती, परंतु शिक्षकांच्या नोकऱ्याच कमी झाल्या आणि शासकीय शिक्षक भरती देखील थांबल्याने अनेक डीएड पदवीधारक बेरोजगार झाले. याउलट खाजगी संस्था चालकांनी दीड शिक्षकांकडून भरतीसाठी लाखो रुपयांची लूट सुरू केली होती आणि डीएड कॉलेजला ओहटी लागली.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील डीएड कॉलेज बंद पडले होते, आता तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रमाच बंद होणार असून यापुढे विद्यार्थ्यांना थेट बीएडलाच प्रवेश घ्यावा लागणार आहे त्यामुळे डीएड पदवी यापुढे कोणालाही मिळणार नाही असे म्हटले जाते परंतु अद्यापही या संदर्भात केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून त्या संदर्भात अध्यादेश देखील काढण्यात आलेला नाही परंतु अधिकृत माहितीनुसार या संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे
नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता डीएड कालबाह्य होणार असून शिक्षक होण्यासाठी इंटिग्रेटेड बी एड डिग्री कोर्स असणार आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम राज्याच्या शैक्षणिक वर्तुळावर होणार आहे. पदवीनंतर बी. एड. पूर्वी १ वर्षाचे होते. यात काळानुसार बदल करण्यात आले आणि आता सध्या २ वर्षांचे बी. एड. अभ्यासक्रम सुरू आहे तर डी. एड. अभ्यासक्रम २ वर्षाचे आहे, मात्र नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदलामुळे आता चार वर्षांचे बी. एड. अभ्यासक्रम असणार आहे. त्याचे नाव चार वर्षांचे एकात्मिक बीएड असणार आहे. सदर शिक्षक हे प्राथमिक वर्गाला शिकवणार आहेत. विशेष म्हणजे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षाचा हा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल.
Ded and Bed Course New Education Policy Changes