पंडित दिनेश पंत, नाशिक
तुलसी विवाह आटोपताच लग्न समारंभांचा बार उडाला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात नक्की किती विवाह मुहूर्त आहेत त्याची उत्सुकता आणि नियोजन सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यात ६ लग्न तिथी आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे थांबलेले विवाह समारंभ आता धडाक्यात सुरू झाले आहेत. बाजारातही मोठ्या चैतन्याचे वातावरण आहे. आर्थिक उलाढाल आणि लग्न समारंभांशी निगडीत अनेक जणांना पुन्हा रोजगार प्राप्त झाला आहे. जाणून घेऊया डिसेंबरपासून पुढील विवाह मुहूर्त
विवाह मुहूर्त असे
(नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2022)
डिसेंबर 2021
1,2, 6,7, 11, 13 डिसेंबर
जानेवारी 2022
15, 20, 23, 27, 29 जानेवारी
फेब्रुवारी 2022
15, 11, 18, 21, 22 फेब्रुवारी
(मार्च 22 मुहूर्त नाहीत)
एप्रिल 2022
17, 19, 21, 22, 23, 28 एप्रिल
मे 2022
2,3, 9, 10, 11, 12, 13, 17, 18, 20, 25, 26, 31 मे
जून 2022
6, 8, 11, 12, 13, 14, 15, 16, 22 जून
जुलै 2022
3,5,6,8 जुलै
(ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मुहूर्त नाहीत)
नोव्हेंबर 2022
21, 22, 24, 25, 26, 27, 28 नोव्हेंबर
डिसेंबर 22
2,3,7, 8,9, 14 डिसेंबर
विविध ठिकाणाहून हे मुहूर्त संकलन केलेले आहेत. वरील मुहूर्ताच्या तारखां व्यतिरिक्त शुभ दिवस पाहणे असल्यास त्याचप्रमाणे मुहूर्त वेळेसाठी आपल्याकडील वधू-वरांच्या कुंडली नुसार तज्ञ ज्योतिषांकडून मुहूर्ताच्या वेळा काढून घ्याव्यात.