शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात २६ वर्षीय सीए मुलीचा मृत्यू…राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल

by Gautam Sancheti
सप्टेंबर 22, 2024 | 12:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 77


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रात पुणे येथे 20 जुलै 2024 रोजी कामाच्या अतिभारामुळे केरळमधील एका 26 वर्षीय सनदी लेखापाल मुलीचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने स्वत:हून घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी ती अर्न्स्ट अँड यंग कंपनीत रुजू झाली होती. तिच्या आईने नियोक्त्याला पत्र लिहून दावा केला आहे की उशिरापर्यंत काम केल्यामुळे तिच्या मुलीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे, मात्र कंपनीने हा आरोप फेटाळला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे.

आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की माध्यमातील वृत्त जर खरे असेल तर युवा वर्गाला कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसिक तणाव, चिंता आणि झोप न लागणे, अव्यवहार्य लक्ष्यांचा पाठलाग करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत. आणि कालांतराने त्यांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होते. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, संरक्षित आणि सकारात्मक वातावरण प्रदान करणे हे प्रत्येक नियोक्त्याचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

व्यवसायांनी मानवी हक्कांच्या मुद्द्यांसाठी जबाबदारी घेतली पाहिजे आणि जागतिक मानवी हक्क मानकांशी संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे कार्य आणि रोजगार धोरणे आणि नियम नियमितपणे अद्ययावत आणि दुरुस्त केले पाहिजेत, यावर आयोगाने भर दिला.

त्यानुसार त्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणातील तपासाचा परिणाम देखील आयोगाला जाणून घ्यायचा आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आणि उचलली जाणार आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहे. चार आठवड्यांमध्ये हा अहवाल अपेक्षित आहे.

18 सप्टेंबर 2024 रोजी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या आईने दावा केला आहे की तिच्या मुलीचा मृत्यू मोठ्या कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे, जे कठोर परिश्रमाचा आदर करते परंतु आरोग्याची किंमत मोजावी लागते. मूल्ये आणि मानवी हक्कांबाबत बोलणारी कंपनी आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शुभ वार्ता…इलेक्ट्रीक बसमध्ये आता बस सुंदरी…नितीन गडकरी यांची नवी घोषणा

Next Post

देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे…मुख्यमंत्री

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
GYArt tXEAAbxv

देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे...मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011