नवी दिल्ली – भारतीय रेल्वे विभागातील लाखो कामगारांसाठी (Contractual Workers) आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने कामगारांच्या महागाई भत्त्यात ४.२६ टक्के वाढ केली आहे. कामगारांचा आता महागाई भत्ता ३४०.९५ टक्क्यांवरून वाढून ३४५.२१ टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू केली जाणार आहे.
रेल्वे मंडळाने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, ही वाढ देशातील सर्व रेल्वे विभागात तत्काळ लागू करावी. पत्रात रेल्वेच्या युनिट्सना संबोधित करण्यात आले आङे. संचालक प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, रेल्वेच्या ९ युनिट्समधील कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्याचा खालील कामगारांना लाभ मिळणार आहे.
खाणींमध्ये काम करणारे
जे कामगार जिप्सम खाण, माती खाण, मॅग्नेसाइट खाण, चायना माती खाण, क्यानाइट खाण, तांब्याची खाण, व्हाइट क्ले खाण, दगडाची खाण, स्टिटाइट खाण, गेरूची खाण, एस्बेस्टस खाण, फायर क्ले खाण, क्रोमाइट्स खाण, क्वार्टजाइट खाण, क्वार्टर्स खाण, वाळूची खाण, ग्रॅफाइटची खाण, फेलस्परची खाण, लेटराइट खाण, डोलोमाइट खाण, रेड ऑक्साइड खाण, वोल्फ्राम खाण, लोह खनिज खाण, ग्रॅनाइटची खाण, रॉक फॉस्पेट खाण, हेमेटाइट खाण, मार्बल आणि कॅल्साइट खाण, युरेनियम खाण, अभ्रक खाण, लिग्नाइट खाण, मॅग्नाइट खाण इत्यादी ठिकाणी काम करतात त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे.
बांधकाम मजूर
रस्ते किंवा रनवे सारख्या पायाभूत सुविधांचे काम करणार्या किंवा देखरेख ठेवणार्या किंवा कार्यालयात संचालन करणार्या भूमिगत इलेक्ट्रिक, विनातार, रेडिओ, टेलिव्हीजन, टेलिग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन केबल आणि या प्रकारच्या इतर भूमिगत तारांचे काम करणार्या कामगारांना तसेच वीज तारा, पाणीपुरवठा लाइनचे काम करणारे, मलजल वाहिनी बसविणार्या कामगारांना याचा लाभ होणार आहे.
वजन उचलणारे कामगार
माल शेड, रेल्वेचे पार्सल कार्यलये, इतर माल शेड, गोदाम, गोदाम आणि इतर कामांमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग करणारे कामगार, बंदरे, विमानतळांवर प्रवाशांचे सामान आणि कार्गोमध्ये काम करणार्या कामगारांना लाभ मिळणार आहे.