विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या संकटात आंदाची बातमी समोर आली आहे. कोरोनावर प्रभावी असलेले औषध तयार झाल असून त्याच्या आपत्कालीन वापराला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट काहीसे कमी होण्यात मदत होणार आहे.
संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या कोरोनावरच्या औषधाच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआय अर्थात भारतीय औषध नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली आहे.
टू-डिऑक्सी डी ग्लुकोज हे औषध covid-19 च्या उपचारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पावडर स्वरूपात उपलब्ध असलेले हे औषध पाण्यात मिसळून तोंडावाटे घेता येणार आहे.
डीआरडीओची प्रयोगशाळा असलेल्या आण्विक औषधे आणि तत्सम विज्ञान संस्थेनं डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने हे औषध बनवले आहे. डीसीजीआयनं कोविड रूग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी या औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे.