बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रोईंगपटू दत्तू भोकनळ प्रकरणात शेतकरी नेत्यांची उडी; अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धार

जुलै 29, 2021 | 2:14 pm
in स्थानिक बातम्या
0
dattu bhoknal

चांदवड – आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळला रोईंग फेडरेशनने अचानक सराव बंद करण्यास सांगितले. त्यामुळे त्यास टोकियो ऑलम्पिकला मुकावे लागले. लष्करी सेवेत असल्याने फेडरेशनविरूद्ध जाहीरपणे बोलता येत नसल्याने नैराश्येतून आपण राजीनामा दिल्याची खंत रोईंगपटू दत्तू भोकनळ याने व्यक्त केली. दत्तूवर झालेल्या अन्यायाबाबत पुणतांब्याचे किसान क्रांतीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक योगेश रायते यांनी थेट तळेगाव रोहिला दत्तूच्या घरी जाऊन सत्य परीस्थिती जाणून घेतली. त्यावेळी दत्तूने आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली.

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या खेडेगावातील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील दत्तू भोकनळने लष्करी सेवेतून रोईंगपटू म्हणून देशाला “आॉलिम्पिक २०१६” मध्ये रोईंगमधील पहिले सुवर्णपदक मिळवत केलेल्या कामगिरीमुळे भारत सरकारने क्रीडाविश्वातील देशपातळीवरील मानाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करुन दत्तूचा गौरव केला. सध्या सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुन्हा देशाला सुवर्णपदक मिळवण्यासाठी दत्तू जीवतोड सराव करत होता. त्याची गुणवत्ता व क्षमता नक्कीच सुवर्णपदकाची होती. तरीही रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाने येनकेनप्रकारे दत्तूवर अन्याय करत थातूर-मातूर कारण पुढे करत सराव शिबिरातून बाहेर जाण्यास सांगितले. याबाबत भोकनळने जाहिरपणे माझे काय चुकले, असा सवाल केला. त्यामुळे हा सर्व प्रकार समजून घेण्यासाठी पुणतांब्याचे किसान क्रांतीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले, किसान क्रांतीचे राज्य समन्वयक योगेश रायते यांनी थेट तळेगाव रोहिला दत्तूच्या घरी जाऊन सत्य परीस्थिती जाणून घेतली. ‘रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया’च्या मनमानीमुळे दत्तूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. तसेच, इतरही सर्व घडलेल्या घडामोडी सांगितल्या. लष्करी सेवेत असल्याने फेडरेशनकडून होणाऱ्या अन्यायाबाबत जाहिरपणे बोलता येत नसल्याने आपण नैराश्यातून राजीनामा दिल्याचे दत्तूने सांगितले. दत्तूवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेत्यांनी दत्तूला न्याय मिळेपर्यंत भक्कमपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले. यापुढेही सराव सुरु ठेवण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी मदत करा, मी रोईंगमधील सलग दुसरे सुवर्णपदक घेणारच, असा आत्मविश्वास दत्तूने व्यक्त केला.

याबाबत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार व पालकमंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी (दि.२७ जुलै) मेलद्वारे दत्तूला न्याय मिळावा, अशी मागणी किसान क्रांतीने करत भेटीची वेळ मागतली आहे. दत्तूला न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कारण न देताच सरावातून बाहेर काढले
पुणे ऑलिंपिक शिबिरामध्ये माझा सराव व्यवस्थित सुरू होता. २०१६ च्या ऑलम्पिकमध्ये मी जो टाईमिंग दिला होता त्यापेक्षा चार सेकंद मी तो टाइम कमी केला. त्यानंतर शिबिरांमधून अचानकपणे मला बाहेर जाण्यास सांगितले. २७ नोव्हेंबर २०२० पासून आतापर्यंत बर्‍याच वेळेस रोइंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे मला बाहेर जाण्यास का सांगितले, हे विचारले. अजूनही उत्तर मिळालेले नाही. या नैराश्यातून मी आर्मी सोडण्याचा निर्णय घेतला. कारण, मला आर्मीत राहून माझ्यावरील अन्यायाबाबत जाहिरपणे बोलता येत नव्हते.
– दत्तू भोकनळ, रोईंगपटू
न्याय मिळून देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी संघटित व्हावे
अर्जुन पुरस्कारप्राप्त ऑलिम्पियन दत्तु भोकनळ यांची गुणवत्ता व क्षमता यामुळे रोईगमध्ये देशाला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळालेले आहे तसेच आज सुरु असलेल्या टोकीओ ऑलिम्पिकसाठी दत्तुचा कसुन सुरु असलेला सराव व टाईमिंग पुन्हा देशाला सुवर्णपदक मिळऊन देणारा आसतांनाहि रोईंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी येनकेनप्रकारे दत्तुवर अन्याय करत सराव शिबिरातून बाद केल्याने देशाला व दत्तुला सुवर्णपदकाला मुकावे लागले आहे यामुळे क्रीडाप्रेमींचे मनोबल खच्चीकरण होत असल्याने भोकनळ यांना न्याय मिळून देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी संघटित व्हावे.
-धनंजय जाधव, मुख्य समन्वयक,किसान क्रांती महाराष्ट्र राज्य
वेळ पडल्या आंदोलन करु
इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीयामधून दत्तु भोकनळ यांचेवर झालेल्या आन्याबद्दल माहिती मिळाली म्हणून सत्य परीस्थिती समजून घेण्यासाठी काल आम्ही तळेगाव रोही येथे प्रत्यक्ष घरी जाऊन सविस्तर माहिती करुन घेतली असता जाणिवपूर्वक भोकनळ यांना डावलण्यात आले असे दिसते अत्यंत प्रतिकुल परीस्थितीशी झगडुन देशाला बहुमान मिळून देणाऱ्या शेतकरीपुत्रावर होणारा अन्याय चिड आणणारा आहे भोकनळ यांना न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा तर करुच पण प्रसंगी आंदोलनाची वेळ पडली तरी हरकत नाही.
-हंसराज वडघुले, संस्थापक अध्यक्ष,संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – महिन्याला १५ हजार रुपये खंडणीची मागणी, एकाला अटक

Next Post

नाशिक – कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत मंजूर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
IMG 20210729 WA0008

नाशिक - कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत मंजूर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011