शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

श्रीदत्त परिक्रमा : जिथे गुरुचरित्र लिहिण्यात आले ते ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2022 | 5:03 am
in इतर
0
FG3hiOxVIAE0 3V

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा
भाग १० श्रीदत्त स्थान महात्म्य १६वे
श्रीक्षेत्र कडगंची : जिथे गुरुचरित्र लिहिले!

आज आपण श्रीक्षेत्र कडगंची या दत्तस्थानाचा महिमा पाहणार आहोत. या स्थानाचे विशेष म्हणजे दत्त भक्तांना वंदनीय ,पूजनीय ,प्रात:स्मरणीय असलेल्या ग्रंथराज गुरुचरित्र या महान ग्रंथाचे लिखाण या ठिकाणी झाले आहे. श्रीदत्त परिक्रमेमुळे या स्थानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीचे निर्मिती स्थान असलेल्या नेवासे या गावाला जे महत्व आहे तेच महत्व दत्त संप्रदायात कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कडगंची या स्थानाला आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

श्रीक्षेत्र कडगंची : जिथे गुरुचरित्र लिहिले!
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने तर सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, वगैरे आज आपण श्रीक्षेत्र कडगंची या दत्तस्थानाचा महिमा पाहणार आहोत. या स्थानाचे विशेष म्हणजे दत्त भक्तांना वंदनीय, पूजनीय, प्रात:स्मरणीय असलेल्या ग्रंथराज गुरुचरित्र या महान ग्रंथाचे लिखाण या ठिकाणी झाले आहे.

श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदासमान असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ श्रीक्षेत्र कडगंची, कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर आहे. सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक हे काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडंआहे. मात्र श्रीदत्त परिक्रमेमुळे या स्थानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीचे निर्मिती स्थान असलेल्या नेवासे या गावाला जे महत्व आहे तेच महत्व दत्त संप्रदायातील श्रीक्षेत्र कडगंची या स्थानाला आहे.

गुरुचरित्र ग्रंथात काय आहे?
गुरुचरित्र हा ग्रंथ तसा सुप्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील प्रत्येक भक्ताला गुरुचरित्र माहित आहे पण इतर सर्व सामान्य भाविकांना देखील गुरुचरित्र निदान ऐकून तरी ठावूक असते. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते. अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.गुरुची कृपा प्राप्त करणे, ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते.

विविध व्रत- वैकल्ये, तीर्थक्षेत्र आणि यात्रा यांची वर्णने, समाजात कसे वागावे याचे नियम यात सांगितले आहेत. त्या जोडीने अश्वथ, औदुंबर , भस्म इ. दत्त संप्रदायाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पनांचे महत्त्व सांगितले आहे. अंगाला भस्म विलेपन कसे करावे, शिवपूजा कशी करावी याचेही मार्गदर्शन या ग्रंथात केलेले आहे. महिलांसाठी पातिव्रत्य आणि आतिथ्य म्हणजे अतिथी सत्कार याचे महत्त्व या ग्रंथाने विशद करून सांगितले आहे.
ऐतिहासिक संदर्भ- ज्या काळात हा ग्रंथ रचला गेला आहे त्या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि निजामशाही यांची राजवट होती. त्यामुळे धर्माधर्मात तेढ न वाढता समाजात शांतता प्रस्थापित व्हावी याविषयी विवेचन या ग्रंथात केलेले दिसते.

गुरुचरित्र पारायण कसे करतात?
गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणा-या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर ईशचिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे.

गुरुचरित्राचे लेखक श्री.सरस्वती गंगाधर
श्रीगुरुंचा कालावधी हा इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ मानला जातो. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्रीगुरुंचे मुख्य ७ संन्यासी शिष्य होते. या बरोबरच संसार करुनही श्रीगुरुंना निरंतर समर्पण भावानं पूजणारे अनेक संसारीजन श्रीगुरुंचे शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री सायंदेव साखरे, अर्थात् श्रीगुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा, जे कडगंची या मूळ गावी राहून वासरब्रह्मेश्वर (आज आंध्रप्रदेशात असलेलं बासर! या ठिकाणी सरस्वतीमंदिर आहे.) या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते. श्री सायंदेव-नागनाथ-देवराव-गंगाधर आणि सरस्वती (श्रीगुरुचरित्राचे लेखक) असा हा श्री सायंदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे.

मराठी येत नसतानाही मराठीत ग्रंथ लेखन
या ग्रंथाचे विशेष म्हणजे या ग्रंथ लिहिनार्या श्री. सरस्वती गंगाधर यांना मराठी भाषा मुळीच येत नव्हती. त्यांनी श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच ३८ व्या ओवीत ‘भाषा न ये महाराष्ट्र्’ असा उल्लेख करुन स्वतःला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून, केवळ श्रीगुरुंच्या दैवी कृपेनंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनःपुन्हा कथन केलं आहे!
श्री सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे. श्रीगुरुंच्या ‘श्रीनृसिंहसरस्वती’ या नावात ‘सरस्वती’ असल्यानं आणि स्वतःच्याही नावात ‘सरस्वती’ असल्यानं श्री सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख ‘नामधारक’ असा केलेला आहे.

‘करुणा पादुका’ आणि नाणीयुक्त कलश
श्री सायंदेवांचे पुढे वंशज नसल्यानं १९९५ साली, जेंव्हा त्यांच्या कडगंचीतील रहात्या वाडयाचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, तेंव्हा जुन्या झालेल्या एकेक भिंती पाडण्यास सुरुवात झाली. कार्यात एका ठिकाणी ‘करुणा पादुका’ आणि नाणीयुक्त कलश आढळला. आजही त्या पादुका कडगंचीस पहावयास मिळतात. खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं. श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलेली आणि श्री सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरुपात आहे.

श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून, पुष्पांच्या आसनावर बसून कर्दलीवनात जाण्याआधी श्रीगुरुंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना (ज्यामधे श्री सायंदेवही होते), “आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची ४ प्रसादपुष्पं येतील. ती काढून घ्या.” अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंतीपुष्पं श्री सायंदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसादपुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. ‘अधिकारी’ दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभा-यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे असं म्हणतात.

भव्य आणि देखणे दत्त मंदिर
कडगंची या लहानशा गावातील दत्त मंदिर अतिशय भव्य आणि देखने आहे . ट्रस्टींमधले सर्व सदस्य एकदिलाने मंदिराचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी धडपडतात. नि:स्वार्थी वृत्तीने श्री शिवशरणाप्पा हे गावोगावी जाऊन डोनेशन मिळवितात. मोठमोठ्या लोकांनी बांधकामास हातभार लावला आहे, लावतच आहेत. त्यामुळे बांधकाम अखंड चालूच आहे. आजपावेतो मंदिर बांधण्यास सुमारे ८० लाख खर्च आला असून सध्या गोपूर बांधण्याचे कार्य चालू आहे. त्यासाठी सुमारे ३ लाखपर्यंत खर्च येणार आहे. त्याची तरतूद चालू आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून आजपावेतो पैशाची अडचण आली नाही. महाराष्ट्रातील थोर संत, सत्पुरुष येथे भेटी देऊन जातात. श्री ठाकूर महाराज यांनी साधनासदनात श्री नृसिंहसरस्वती यांची मनोहर मूर्ती बसविली आहे. अशातऱ्हेने कडगंची क्षेत्राची निर्मिती झाली.

काळ्या पाषाणातील सुंदर दत्त मूर्ती
श्री सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाडयाच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवान् श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री शंकराचार्यांनी २५ फेब्रुवारी २००२ मध्ये स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करुन घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.

गुहेत झाले गुरुचरित्राचे लिखाण
श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

कडगंचीस कसे जावे :
गाणगापुर गाव ते रेल्वे स्टेशन २२ कि. मी. अंतर आहे. पुढे गाणगापूर रेल्वेस्टेशन पासून ३० कि. मी. अंतरावर कडगंची हे पवित्र स्थान आहे. गुलबर्ग्यापासून २३ कि.मी. तर अक्कलकोट पासून ६५ कि. मी. अंतरावर आहे.
संपर्क: श्री सायंदेव देवस्थान ट्रस्ट समिती , मुक्काम पोस्ट कडगंची ,ता. आळंदी, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक – ५८५३११
या ठिकाणी जावयाचे असल्यास खालील दूरध्वनीवर संपर्क केल्यास सर्व सोयी उपलब्ध होतील.
फोन: ०८४७७-२२६१०३ १) शिवशरणप्पा: ० ९७४०६ २५६ ७९ २) विश्वनाथ माडगोंड: ० ९९०११ ७८५ ९३

श्रीदत्त परिक्रमेत आज आपण प्रात:स्मरणीय असलेल्या ग्रंथराज गुरुचरित्र या महान ग्रंथाचे लिखाण जिथे झाले आहे त्या श्रीक्षेत्र कडगंची या दत्तस्थानाचा महिमा पहिला आहे .उद्या आपण श्रीधर स्वामींचे जन्मस्थान असलेल्या लाडाची चिंचोळी येथे जावू या!
(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com /श्रीगुरुचरित्र ; छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)
संपादन प्रस्तुती: विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Datta Parikrama Gurucharitra Kadganchi by Vijay Golesar
Dattatraya

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा आज होईल महत्त्वाचा फोन कॉल; जाणून घ्या, शनिवार, २६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

अभिनेत्री अन्विता फलटणकरने उघड केलं बाथरूम सिक्रेट

Next Post
Anvita Phaltankar

अभिनेत्री अन्विता फलटणकरने उघड केलं बाथरूम सिक्रेट

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011