विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनाची लागण झालेली आहे किंवा नाही याची खात्री देणाऱ्या RT-PCR या चाचणीबाबत येथील दातार कॅन्सर जेनेटिक्सने मोठी घोषणा केली आहे. यापुढे ६० वर्षे वयापुढील नागरिकांकडून या चाचणीचे कुठलेही शुल्क दातार जेनेटिक्स घेणार नाही. म्हणजेच, ६० वर्षे वयापुढील नागरिकांसाठी ही चाचणी मोफत असणार आहे. नाशिक शहरातील तीन संकलन केंद्रांवर ही सुविधा दातार जेनेटिक्सने उपलब्ध करुन दिली आहे. त्यात गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालय, अंबड औद्योगिक वसाहतीतील एफ ७, डी रोड आणि त्र्यंबक रोड वरील आयटीआय या संकलन केंद्रांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या चाचणीसाठी ८०० ते ८५० रुपये आकारले जातात. मात्र, आता ही चाचणी ज्येष्ठांना मोफत असणार आहे.