नाशिक, (इंडिया दर्पण वृत्तसेवा): वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिद्धी होत असल्याने तसेच महत्वाच्या सणामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुद्रांक जिल्हाधिकारी व सर्व दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च 2025 या शासकीय सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत, असे नाशिकचे सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीचे काम करून घ्यावे, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.