सोमवार, नोव्हेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025 | 7:24 am
in संमिश्र वार्ता
0
FB IMG 1758073921656

जगदीश देवरे, नाशिक
खरंतर आपण कोकणात पर्यटनापुरतेच जातो. तिथल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यापासून सुरू झालेले पर्यटन ताज्या मासोळीवर ताव मारत मारत व्हाया निसर्गरम्य सौंदर्य न्याहाळत, परतीच्या प्रवासात कोकणी प्रॉडक्टचे शॉपींग करुन आपण माघारी परत फिरतो तीच आपल्यासाठी कोकणाची सफर. परंतु, कोकणाची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे तिथली समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा, तिथली गोड माणसं आणि तिथला जिंवत असा ऐतिहासीक वारसा. या गोष्टी पर्यटनाला जाणारे पर्यटक म्हणून सगळेच अनुभवतात असे नाही. ओशन आर्ट हाऊस निर्मीत ओशन फिल्म कंपनीचा व सुबोध खानोलकरांनी दिग्दर्शित केलेला ‘दशावतार’ हा मराठी सिनेमा बघतांना या गोष्टीची जाणिव नक्की होते.

ज्यांनी १९८२ साली रिलीज झालेल्या ‘एक डाव भुताचा’ मधली भुमिका अजरामर केली आणि तोच न्याय २००६ साली रिलीज झालेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधल्या महात्मा गांधीजींच्या भुमिकेला देखील तिला, ते दिलीप प्रभावळकर या चित्रपटाचे हिरो आहेत. वय वर्ष ८१…. असून सुद्धा.

शहरीकरणाचा चटका अद्यापही न सोसलेल्या कोकणच्या प्राचीन भागात ‘रंगमंच’ हा आपल्याकडच्या ‘मोबाईल’ इतकाच लोकप्रिय आहे. बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) हा या परंपरागत रंगमंचाचा एक हाफ मॅड चाहता. (हे माझे नाही, चित्रपटातले शब्द आहेत). अगदीच तरुण असल्यापासून तर आता म्हातारपणी अगदी रातआंधळेपणा लागायची वेळ आली, तरी भगवान विष्णूच्या दशावतारी भुमिका साकारतांना ज्याला परमोच्च आनंद मिळतो असा कलाकार. त्याच्या लाकडी ट्रंकेत मत्स्य, वराह, नरसिंह, राम, हनुमान आणि यासारख्या इतर कुठल्याही पौराणिक पात्राच्या भुमिकेसाठी ऑर्डर येतील त्यानुसार वेशभुषा तयार आहेत. या सर्व पात्रांची वेशभूषा, मेकअप आणि अभिनय बाबुली स्वत:च स्वतःच्या हाताने करतो. बाबुलीच्या अदाकारीवर सगळे जाम खुष असतात. यातून त्याला दोन पैसे मिळतात ज्यावर त्याच्या कुटूंबाची उपजिवीका चालते. कुटूंबात माणसे दोनच, एक तो स्वत: आणि दुसरा त्याचा तरुण मुलगा माधव (सिध्दार्थ मेमन). बाबुलीचं वय झालयं, त्याला नीट दिसत नाही, रंगमंचावरचा फोकस असाच डोळ्यावर कायम पडत राहीला, तर एक दिवस कायमचा आंधळेपणा येईल ही रास्त‍ भिती डॉक्टरांना वाटत असली तरी बाबुलीला मात्र त्याचे काहीच वाटत नाही.

माधव आता मोठा झालाय. आपल्या बापाने दशावतार थांबवावा म्हणून तो प्रयत्न करतो. त्यासाठी स्वत: कमावते व्हावे लागेल याची जाणीव त्याला होते. परंतु, शिकल्या सवरलेल्या माधवला कोकणात नोकरी कुठून मिळायची? त्याने बाहेर जावे तर बाबुलीची नाळ कोकणाशी घट्ट जुळलेली, ती कशी तोडायची? शेवटी माधव एका स्थानिक खाणीमध्ये नोकरी पत्करतो आणि आता त्याबदल्यात बाबुलीला दशावतार सोडावा लागेल या निर्णयाप्रत कथानक येते.

पुढे मग चित्रपटाच्या कथानकाचा प्रवाह अगदीच बदलतो, एखाद्या ॲक्शन पॅक्ड चित्रपटासारखा.
कातळशिल्प ही कोकणची ऐतिहासिक ठेव आहे. पण खाण खोदून पैसा कमवायचा असेल तर विकासाच्या नावाखाली तिथे सुरूंग लावावाच लागेल. गेल्या काही दिवसांपासून कोकणवासियांचा असल्या विकासाला असलेला विरोध आपण बातम्यांतून आधीच बघितलेला असल्याने कथानकातला दशावतार संपायला लागतो. खाणीसाठी घेतला गेलेला माधवचा बळी आणि त्यानंतर त्याचा बळी घेणाऱ्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी रंगमंचावरुन रस्त्यावर आणि नंतर जंगलातल्या कडेकपारीत सुरू होणारा दशावतारी प्रवास. कथानक खुप छान आहे, परंतु सुरूवातीला अस्सल कोकणातल्या मातीतली वाटणारी ही कथा अखेरच्या टप्यात ‘पुष्पा’ सारख्या रंजकतेकडे केव्हा वळण घेते हे प्रेक्षकांना कळतच नाही.

वंदना (प्रियदर्शनी इंदलकर) ही माधवची मैत्रीण. बाबुली मेस्त्री या कथानकाचा शेवट वंदनाकडे सुपूर्द करतांना म्हणतो “आता दशावतार संपलाय आणि भैरवी सुरू झाली आहे”. दशावतार छान जमलाय, परंतु ही भैरवी सादर करतांना जरा गफलतच झाली असे म्हणत प्रेक्षक घराकडे वळतात.

‍दिलीप प्रभावळकरांचा अभिनय हा या चित्रपटाचा आत्मा आहे. हा एकच आत्मा चित्रपटात पुर्णवेळ वापरला गेला असता तर ती कदाचित मोठी रिस्क ठरली असती. पर्यायाने, ही गोम ओळखून कथानक निर्णायक बिंदुकडे नेण्यासाठी एन्ट्री घेणाऱ्या महेश मांजरेकरांनी वठवलेली मायकेल डिकोस्टा या पोलीस अधिकाऱ्याची भुमिका लाजबाब ठरते. हा डिकोस्टा स्वत:ला गांजील (गांधीलमाशी) म्हणवून घेणारा आणि एकदा मागे लागलो की सुजवल्याशिवाय थांबत नाही असे म्हणणारा, अगदी महेश मांजरेकरांच्या व्यक्तीमत्वाला साजेसाच. प्रियदर्शनी इंदलकर हे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सौंदर्य कोकणच्या मातीत आणखीनच खुलतांना दिसून येते. माधवची प्रेयसी असलेली आणि सुरूवातीला विनोदाचे पंचेस मारणारी वंदना नंतर मात्र धगधगती मशाल बनते. हा प्रवास अभिनयातून पेलवणे कठीण होते, परंतु प्रियदर्शनीने हा प्रवास अगदीच सोप्पा करून दाखवलाय. माधव मेस्त्री बनलेला सिध्दार्थ मेमन देखील छान. सुनिल तावडे (हवालदार जनार्दन परब), भरत जाधव (फॉरेस्ट ऑफीसर लक्ष्मण परब) यांच्या भुमिका छान आहेत. परंतु, निगेटीव्ह रोलमध्ये ते प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. नको वाटतात. विजय केंकरे यांची देखील सरमळकर नावाचा खाणीचा मालक उभा करतांना, त्यांच्यातला चरित्र अभिनेता आणि खलनायक यात चांगलीच सरमिसळ झाल्याचे जाणवते.

बाप बाप बाप माझा आवशीचा घो, गोड मानूनी घे रंगपूजा ही गुरू ठाकूरांची गाणी नक्कीच गुणगुणण्यासारखी आहेत. चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे यात वादच नाही. परंतु, काही तर्क बाजुला ठेवून आणि काही त्रृटी पोटात घालून. आपली कमाई वाढविण्यासाठी राजकीय मदतीने कोकणच्या भुमीचे पोट फाडून खाण उद्योग तिथे पाय पसरू पहातोय. कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर पडू पहाणारी ही कुऱ्हाड वेळीच रोखली गेली पाहिजे हा मेसेज जरी या चित्रपटाच्या निमीत्ताने जनमाणसात रुजला तरी या दशावताराचे फलीत होईल हे नक्की. जगंलात एक रखवालदार असतो आणि तोच जगंलाचे, कोकणाचे रक्षण करतो असा इथल्या भोळ्या भाबड्या कोकणी माणसाचा समज आहे. या स्वप्नवत वाटणाऱ्या रखवालदाराच्या पायथ्याशी दशावतार नावाच्या मराठी सिनेमाने एक पणती जरी पेटवली तरी पर्यावरण राखणारा मोठा उजेड त्यातून पडेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

Next Post

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
eknath shinde

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011