नाशिक -दसरा सणानिमित्त नागरिक व्यवहारांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधान्य देत असतात. त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या अधिनस्त असलेली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शुक्रवार 15 ऑक्टोबर 2021 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्र. 1, 2 व 7 ही तीन कार्यालये व शनिवार 16 ऑक्टोबर 2021 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग -2 मधील नाशिक क्र. 6 व 4 ही दोन कार्यालये सुरू राहणार आहे. तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.