इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नव्या मद्य धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मद्यपींना सवलतीच्या दरात दारु मिळणार आहे. सरकारने १ ऑक्टोंबरपासून सरकार मान्य दारु दुकानांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मद्यप्रेमींना सवलतीच्या दरात दारु मिळणार आहे.
आंध्र प्रदेशमध्ये आता ९९ रुपये किंवा त्यापेक्षा कमी दरात १८० एमएलची क्वार्टर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोबतच दारुची दुकाने उघडी ठेवण्याची वेळ तीन तासांनी वाढवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी अमरावती येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत नव्या मद्य धोरणाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. या नव्या मद्य धोरणातून २००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा महसूल अपेक्षीत आहे.