पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे पथकाने २२ जुलै रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गाव हद्दीत टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस, मोकळया जागेत तसेच जेजुरी गावच्या हद्दीत बारामती जेजुरी रोड लगत, ओढ्याच्या काठी दोन विकाणी सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या भट्टीवर छापे मारले.
या छाप्यामध्ये ५५५० लिटर रसायन, १८५५ लिटर अवैध गावठी हातभटटी दारु व निर्मीती साहीत्य असा एकुण अंदाजे ३,९४,५०० किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या ठिकाणी गावठी दारूभट्टी तयार करणा-या इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ब. क. ई. फ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढे देखील अवैध गावठी हातभटटी दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने सातत्याने छापे मारण्याची कारवाई सुरु राहणार असल्याचे निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
सदरची कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते, जवान शशीकांत भाट, संदिप सुर्वे व ऋतिक कोळपे यांनी केली असून, या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करीत आहेत.
पुणे शहरातील नागरीकांना अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास त्यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधवा असे, आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.