पुणे (इंडिया दर्पण वृ्तसेवा) – बहुचर्चित एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असलेल्या राहुलला अखेर मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने राहुलला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती आहे. तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवातून स्पष्ट झाले होते.
हत्येची कबुली
आजच्या काळात एखादा तरुण विकृत मनोवृतीचा झाला तर तो काय करेल याचा भरोसा राहिला नाही, याचे उदाहरण म्हणजे दर्शना पवार हिची हत्या होय, नात्यातीलच राहुल हंडोरे याने भयानक कृत्य केले आहे.
त्यानंतर राहुल हा वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथके त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले आहे. तपास सुरु असताना राहुलने कबुली दिली नव्हती मात्र त्यानंतर पोलिसांनी पाच पथकं तपास करत असताना राहुलने हत्या केल्याची कबुली दिली आहे. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहे. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही
एमपीएससी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती.
फोन रेकॉर्ड काढले
दरम्यान, दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. तसेच त्याने याबाबत दर्शना आणि कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली. राहुलचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके नेमली होती. ही सगळी पथके मुंबई, सिन्नर, लोणावळा, नाशिक आणि पुण्यात तपास करत होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राहुलचे आणि दर्शनाचे फोन रेकॉर्ड काढले होते. तो ट्रेनने प्रवास करत असल्याचा अंदाज पोलिसांना होता. तपासासाठी राहुलच्या कुटुंबियांचा आधार घेतला होता. या सगळ्या प्रवासादरम्यान त्याने घरच्यांकडे पैसे मागितले होते. तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याचा फोन सुरु होण्याची वाट बघत होते. पाच ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
आईची मागणी
दर्शना पवारची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर दर्शनाच्या आीने प्रतिक्रीया दिली आहे. तिची आई म्हणाली की, माझ्या मुलीचे जसे तुकडे करण्यात आले तसेच राहुलचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देऊ शकते. माझी मुलगी गेली आहे, तशा इतरांच्या मुली जाऊ नये. यासाठीच राहुलला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. राहुलला शिक्षा देण्यासाठी मी समर्थ आहे. त्याला आमच्या ताब्यात द्यावे. अन्यथा त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.