नाशिक – दारणा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पाऊस सुरु आहे. जलाशयातील पाणीसाठा आज सकाळी ७५ टक्के झाला आहे. दारणा जलाशयातून विद्युत गृहाद्वारे आज सकाळी १० वाजेपासून ५५० क्युसेक्स विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाऊस सुरुच राहिल्यास व पाणीसाठ्यात आणखी वाढ झाल्यास दारणा जलाशयाच्या रॅडिअल गेटस मधून आणखी विसर्ग करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.