निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डांगसौंदाणे उपबाजार समितीचा शेतमाल खरेदी शुभारंभ बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडला… गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला डांगसौंदाणे उपबाजार आज दसऱ्याच्या शुभमुहूर्त वर सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत आपला शेतमाल या उपबाजार समितीच्या आवारात आणला.
उपबाजार समिती चे आवार शेतकऱ्यांच्या उपस्थितीने गजबजले होते. सटाणा येथील बहुसंख्य व्यापारी व स्थानिक व्यापारी यांनी उपबाजार समितीत नऊ ट्रॅक्टरमधून आलेला सुमारे 300 क्विंटल खरिपाचा मका व 29 ट्रॅक्टर मधून आलेला 900 क्विंटल उन्हाळ कांदा या व्यापाऱ्यांनी खरेदी केला. खरीपाच्या मक्याला 3251 रुपये हा सर्वाधिक दर लौकिक ट्रेडिंग कंपनीचे संचालक पंकज बधान यांनी वनोली येथील शेतकऱ्याच्या मक्याला दिला तर कांद्याला 2100 रुपये दर स्थानिक व्यापारी शिवा बैरागी यांनी दिला.मक्याला सरासरी सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर कांदा पंधराशे ते अठराशे रुपये दरम्यान या उपबाजारात विकण्यात आला. डांगसौंदाणे उपबाजार समितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे. या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पंकज ठाकरे यांनी दिली.
उपस्थित संचालक मंडळ व पदाधिकारी व्यापारी हमाल ,मापारी यांचा डांगसौंदाने ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला संचालक मंडळाने उपबाजार समिती सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान संचालक संजय सोनवणे यांनी आभार मानलेत.तर उपबाजार समिती निर्मितीसाठी आलेल्या अडचणी आणि त्यातून खडतर असा मार्ग काढीत डांगसौंदाणे उपबाजार सुरू केल्याची माहिती विद्यमान संचालक व माजी सभापती संजय देवरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या उपबाजार समितीच्या निर्मितीसाठी तब्बल 538 कागदपत्रांची फाईल व विविध विभागांच्या दाखल्यांसाठी तत्कालीन सभापती संजय देवरे यांनी मोठा पाठपुरावा केल्याचे विद्यमान संचालक केशव मांडवडे यांनी शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले.
स्थानिक संचालक असलेले संजय सोनवणे यांनी वेळोवेळी या बाजार समितीसाठी संचालक मंडळाकडे पाठपुरावा केल्याने उपबाजार समिती आज प्रत्यक्षात सुरू झाल्याची प्रतिक्रिया सभापती पंकज ठाकरे यांनी दिली .या भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डांगसौंदाणे उप बाजार आवारात आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा भविष्यात बाहेरील आलेल्या व्यापाऱ्यांनाही माल साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था बाजार समितीने करून देण्याची विनंती संचालक संजय सोनवणे यांनी बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांना केली.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती मधुकर देवरे संचालक प्रभाकर रौंदळ ,सरदारसिंग जाधव, प्रकाश देवरे, रत्नमाला सूर्यवंशी, संजय बिरारी, तुकाराम देशमुख ,सुनिता देवरे, ज्ञानेश्वर देवरे, केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, संदीप साळे, जयप्रकाश सोनवणे ,मंगला सोनवणे,वेणूबाई माळी, नरेंद्र अहिरे सचिव भास्कर तांबे, उपसचिव विजय पवार ,प्रकाश ह्यालिज, लेखापाल भगवान अलाई, दत्तू साबळे, किरण पवार डांगसाच्या सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, ग्राप सदस्य वैशाली बधान, विजय सोनवणे ,रामचंद्र पवार, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निवृत्त मुख्यध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले. तर आभार सचिव भास्कर तांबे यांनी मानले.