इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापही भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रभाव कमी जास्त होत असताना अनेक जण रुग्णालयात दाखल होतात. तर बहुतांश जण घरीच उपचार घेतात. परंतु रुग्णालयात असो की घरी उपचार घेताना कोरोना संदर्भातील औषधांचा बेसुमारपणे वापर करण्यात आला. तसेच, ही औषधे प्रभावशून्य आणि बोगस असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळेच रुग्णांना उपचारासाठी फायदा होण्याऐवजी अपायच झाला असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. याचसंदर्भात अमर उजालाने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, देशभरात तब्बल ५०० कोटींच्या बोगस आणि प्रभावहीन कोरोना औषधांचा अंदाधुंद वापर झाला आहे.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद स्कारिया यांनी आश्चर्य व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले की, दिल्लीतील एका कुटुंबातील तीन सदस्यांना संसर्ग झाला आहे. सर्वांना लसीकरण करण्यात आले आहे, लक्षणे देखील सौम्य आहेत, एका मोठ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मोलानुपिरावीर घेण्याचा सल्ला दिला आहे जे चुकीचे आहे, नैतिकतेच्या विरुद्ध आहे. काही औषधे कोरोना उपचारात यशस्वी मानली गेली होती आणि कोविड प्रोटोकॉलमध्ये देखील समाविष्ट केली गेली होती, त्यापैकी एकही प्रभावी नाही. फार्मा रिपोर्टनुसार, गेल्या दोन वर्षात लोकांनी 500 कोटी रुपयांच्या औषधांचे सेवन केले आहे. तर यातील काही औषधांचा दुष्परिणाम काळ्या बुरशीच्या रूपात संपूर्ण देशाने पाहिला.
देशभरातील एक्सलन्स सेंटर्सना कोविड उपचाराबाबत माहिती देताना एम्सचे डॉ. अचल कुमार म्हणाले की, दोन वर्षांत केवळ कोरोनाचे रुग्णच नाही तर लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी 2DG, Favipiravir, Ivermectin आणि HCQ सारखी औषधे वापरली आहेत. तसेच कोविडच्या सौम्य किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर ही औषधे प्रभावी नाहीत. नवी दिल्लीस्थित एम्सचा असा विश्वास आहे की, या औषधांचा देशात मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला आहे. कमी वैज्ञानिक पुरावे असलेल्या औषधांनीही करोडो रुपयांचा व्यवसाय केला. पण, आता एम्सने पुढे येऊन या औषधांची चौकशी केली आहे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनाही आवाहन करत एम्सने या औषधांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
काही आरोग्य आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यातील काही अँटी-मायक्रोबियल औषधे होती आणि त्याच्या वापरामुळे विषाणूला बळकटी मिळते. तसेच औषधांचा प्रभाव कमी करतो. मानवी शरीरात सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांना अँटी मायक्रोबियल ड्रग्स म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांच्या यादीतून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि अॅव्हमेक्टिन सारख्या अनेक अँटी-मायक्रोबियल औषधांना वगळले होते. यापैकी ही औषधे पूर्वीच्या आजारांसाठी वापरली गेली आहेत. इबोला व हिपॅटायटीसच्या उपचारांसाठी रेमडेसिवीर देखील वापरले गेले होते.
कोणताही रुग्ण या सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबविण्यासाठी अँटी-मायक्रोबियल औषधे वापरण्यास सुरुवात करतो, तेव्हा या औषधांचा काही काळानंतर सूक्ष्मजीवांवर परिणाम होत नाही. दुस-या शब्दांत, हे सूक्ष्म जीव स्वतःच या औषधांविरूद्ध रेझिस्टन्स निर्माण करतात. जेव्हा या सूक्ष्मजीवांवर अस्तित्वात असलेल्या बहुतेक औषधांचा कोणताही परिणाम होत नाही, तेव्हा त्याला सुपरबग म्हणतात. तसेच कालांतराने, आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही.
दोन वर्षापूर्वी कोरोना हा पूर्णपणे नवीन आजार होता. यापूर्वी डॉक्टरांकडे यावर कोणतेही उपचार नव्हते, म्हणून प्रयोग म्हणून वेगवेगळ्या औषधांचा वापर केला गेला. कधी म्हटले गेले की, कोरोना रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी आहे, तर कधी म्हटले गेले रेमडिसिवीर प्रभावी आहे. यामुळे या औषधांचा उपयोगही अंधाधुंदपणे करण्यात आला. कोरोना विषाणूवर त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही हे नंतर अभ्यासातून पुढे आले. यामुळे भविष्यात इतर रोगांच्या उपचारांमध्येही त्रास होईल.
कोरोना या आजाराची भीती एवढी होती की, लोकांनी सामान्य डोकेदुखीसाठीही बॅक्टेरियाविरोधी औषधांचा वापर केला. बाहेर संक्रमणाचा धोका पाहून बरेच जण डॉक्टरकडे जाण्यास घाबरले. जवळपासच्या मेडिकल स्टोअरमधील तापासाठीची औषधे घेऊ लागले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताप, डोकेदुखीसाठी अँटी मलेरिया ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. वास्तविक कोरोना हा पूर्णपणे नवीन रोग आहे. कोरोनावर जोपर्यंत औषध सापडत नाही, तोपर्यंत कोणीही प्रतीक्षा करू शकत नव्हते, म्हणून डॉक्टरांनी कोरोनाची दुय्यम लक्षणे जसे की सर्दी, खोकल्यासाठी अँटी-बायोटिक औषधांद्वारे उपचार करतात. मृत्यू झालेल्या कोरोना रूग्णांपैकी 50 टक्के रुग्ण कोरोनाच्या सेकेंडरी इन्फेक्शनमुळे दगावले होते. म्हणूनच, कोरोना रुग्णांवर अँटी-बायोटिक औषधांचा काही परिणाम झाला नाही.
आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती की, कोरोनावर अनेक औषधे वापरली गेली ती बरीच महागडी औषधी प्रभावहीन होती,
तसेच आयसीएमआरने एएमआरवर एक अभ्यास देखील केला. या अभ्यासात 3 पैकी 2 लोकांमध्ये अँटीबॉडीचा रेझिटन्स आढळला. हा अभ्यास इंटेस्टाइन ट्रेक्टला इन्फेक्ट करणा-या बॅक्टेरियांवर केला गेला होता. आयसीएमआरने याचे कारण साध्या सर्दी-खोकल्यात देखील अँटी-बॅक्टेरियाच्या औषधांचा वापर केला गेल्याचे सांगितले होते.