नाशिक- आडगाव परिसरात दांडिया महोत्सवात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला. पप्पू बेंडकुळे असे डिजे ऑपरेटरचे नाव आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नवरात्रीनिमित्त आडगाव परिसरात जय जनार्दन फाउंडेशन या मंडळाच्या माध्यमातून दांडियाची आयोजन करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवसांपासून जोरदार दांडिया गरबा खेळाला जात होता. काल शेवटचा दिवस असल्याने आडगाव परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. मागील नऊ दिवसांपासून दांडिया सुरु असल्याने काल देखील नागरिकांनी दांडियाला हजेरी लावली. यावेळी नऊ दिवसांपासून डीजे देखील लोकांच्या सेवेसाठी होता. मात्र काल नऊ वाजेच्या सुमारास दांडिया सुरु असताना अचानक डीजे ऑपरेटर पप्पू बेंडकुळे यास विजेचा शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.









