नागपूर – येथील डॉ. दंदे फाऊंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी ६ ते १२ वर्ष वयोगटासाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक स्पर्धकांना कोणत्याही भाषेतील गाण्याचे एक कडवे गाऊन त्याचा व्हिडीयो 08767929607 या क्रमांकावर व्हॉट्सएप करायचा आहे. ही स्पर्धा व्हिडीयोवर आधारित असल्यामुळे यात महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यातील कोणत्याही देशातील गायक यात सहभागू होऊ शकणार आहे.शिवाय गाण्याला भाषेचे बंधनही नाही. गाताना रेकॉर्डेड ट्रॅक किंवा वाद्यांचा वापर करता येणार नाही. माईकचा वापर केला तर चालणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५०० व १००० रुपयांचे रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. याशिवाय तीन प्रोत्साहनपर पुरस्कारही असणार आहेत. गाणं सुरू करण्यापूर्वी नाव, वय, भाषा आणि शहराचे नाव यांचा उल्लेख अनिवार्य आहे. व्हिडीयो व्हॉट्सएप करताना पीनकोडसह संपूर्ण पत्ता पाठवायचा आहे. गाण्याला विषयाचे बंधन नाही. व्हिडीयो आडव्या स्क्रीनवर रेकॉर्ड केलेला असावा, अशी अट आयोजकांनी घातलेली आहे. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल आगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे घोषित करण्यात येईल. श्रेया खराबे, नुपूर देशपांडे, सारंग लाडसे, अनुराग लाडसे व नहुश बडगे ही संगीत क्षेत्रातील मंडळी स्पर्धेचे परीक्षण करणार आहे. १० आगस्टला दुपारी १२ पर्यंत येणारे व्हिडीयो स्पर्धेसाठी पात्र ठरविले जातील. स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. इच्छुकांनी अटी व शर्तींसाठी तसेच अधिक माहितीसाठी 08767929607 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.