शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नोरा फतेहीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान? सोशल मिडीयावर झाली ट्रोल (व्हिडिओ)

डिसेंबर 4, 2022 | 5:15 am
in मनोरंजन
0
Capture

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फिफा विश्वचषक २०२२ साठी प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या कतारमध्ये आहे. तिथे आपली कला दाखवणाऱ्या नोरा फतेहीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशाचे नाव तिने अधिक उंचावले, असं तिचं कौतुक सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. मात्र, नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तिच्या डान्स परफॉर्मन्सनंतर नोरा फतेहीने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण यावेळी तिच्याकडून मोठी चूक झाली. ज्यावर नेटकरी तिच्यावर टीका करताना दिसत आहेत.

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत नोराने ‘लाइट द स्काई अँथम’ गाण्यावर कला सादर केली. नोरा फतेहीने यावेळी ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या आणि स्टेजवर हातात तिरंगा घेऊन तो अभिमानाने फडकवतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये नोरा फतेही डान्स परफॉर्मन्सनंतर तिरंगा फडकवताना दिसत आहे. तसेच ती ‘जय हिंद’च्या घोषणाही देत आहे. तिच्याबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकांनीही ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. पण या व्हिडीओमध्ये नोराची चूक झाली आहे. आणि ती नेटकऱ्यांच्या लक्षात आली आहे. उत्साहाच्या भरात नोराने तिरंगा उलटा पकडला होता. ज्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

नोरा फतेहीने तिरंगा उलटा धरला आहे. एवढंच नाही तर तिरंगा उचलत असतानाही चुकीच्या पद्धतीने उचलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर तिने हा तिरंगा एका व्यक्तीच्या दिशेने फेकला. नोराचं हे वागणं मात्र नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. आणि यापूर्वी तिच्या कौतुकाच्या कमेंट करणारे तात्काळ तिच्यावर टीका करू लागले आहेत. राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने उचलणे, उलटा पकडणे आणि नंतर फेकून त्याचा अपमान केल्याने नेटकऱ्यांनी नोरावर आगपाखड केली आहे.

नोराने तिच्या इन्स्टाग्रामवर फिफा विश्वचषक २०२२चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “विश्वचषक सुरू असलेल्या स्टेडियममध्ये तुमच्या आवाजातलं गाणं वाजतं, तेव्हा निर्माण होणारी भावना ही वेगळीच असते. अशा गोष्टींची कल्पना मी माझ्या स्वप्नांमध्ये अनेकदा केली होती. हे स्वप्न आज पूर्ण झालं.”

View this post on Instagram

A post shared by Arshin k madhu (@arshin_k_madhu)

Dancer Nora Fatehi Troll Indian Flag Insult Video Viral
FIFA 2022

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दादा भुसेंची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा; भाजप नेत्याचे देवेंद्र फडणवीसांना साकडे

Next Post

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Employment Rojgar Melava

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011