वैजापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘सबसे कातील गौतमी पाटील ‘ हे वाक्य सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचे कारण लावणी आणि रिलस्टार गौतमी पाटीलच आहे. गौतमी पाटीलने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या लावणीच्या जाहीर कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यानंतर होणारी धक्काबुक्की, हाणामारी या अशा बातम्या अनेकदा आल्या आहेत.
बीडमधल्या एका हौशी नवऱ्याने आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. तर दुसऱ्या एका पठ्याने आपल्या आपल्या बैलासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता, पश्चिम महाराष्ट्रात एका कार्यक्रमात इतकी गर्दी झाली होती की हा कार्यक्रम पाहण्यासाठी काही जण झाडावर चढले असताना झाडच कोसळले तर एका ठिकाणी स्टेज मोडले होते. एकंदरीत काय तर गौतमी पाटील हीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर या तालुक्यातील महालगाव येथे बस स्थानकाजवळ गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील येणार म्हटल्यावर काय सांगा ? कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली. गौतमीचा नाच पाहण्यासाठी काही चाहते एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर बसले होते. तिचा जबरदस्त नाच आणि राती अर्ध्या राती हे गाणे सुरु होते. तेवढ्यात जादा वजनाने पत्र्याची शेड कोसळली. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याचे समजते, मात्र नेमके किती लोक जखमी झाले ते समजू शकलेले नाही. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी लोकांना हाकलून लावले.
https://twitter.com/ShyamasundarPal/status/1655777585660583938?s=20
Dancer Gautami Patil Program Shed Collapsed