इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गौतमी पाटील हिची किंवा हिच्यामुळे चर्चा झाली नाही, असा अलीकडे एकही दिवस जात नाही. प्रत्येक दिवशी तिची चर्चा आहेच. सध्या गौतमीने स्वतःचे पाटील हे आडनाव लावावे की नाही, यावरून चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळातील अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. काहींनी गौतमीला पाठिंबा दिला तर काहींनी टीका केली. आता गौतमीचे वडील पहिल्यांदा माध्यमांसमोर येत यावर प्रतिक्रिया देताना दिसले.
कुठे होते गौतमीचे वडील?
गौतमी ही वडिलांसोबत नाही तर तिच्या आईसोबत राहते. मात्र आता मुलीवर होणारी टीका पाहून वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहे. गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी मुलीवर होत असलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे. “तिला पाटील आडनाव लावू नको असे कोणी कसे म्हणू शकते. पाटील ते पाटीलच राहणार. ती पाटील घराण्यातली आहे. ती जात बदलू शकेल का? तुमचे कुळ असेल तेच राहणार, ते कसे बदलेल. त्यामुळे ती पाटील आहे आणि स्वतःला पाटीलच म्हणेल,” असे गौतमीचे वडील सांगतात. यासोबतच त्यांनी गौतमीला पाठिंबा देत होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष कर असा सल्ला देखील दिला आहे.
इतर कलाकारांना असा आग्रह करता का?
गौतमीप्रमाणेच अनेक कलाकार त्यांची कला सादर करतात आणि त्यांनी त्यांचं आडनाव काढावं म्हणून कोणी का बोलत नाही? असं म्हणत टीका करणाऱ्यांना गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आपण गौतमीच्या पाठीशी कायम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काय आहे नेमका वाद?
काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा इशारा दिला होता. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.
Dancer Gautami Patil Father Reaction