सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या संपूर्ण राज्यभरात स्वत:च्या आगळ्यावेगळ्या नृत्यशैलीने धुमाकुळ घालणाऱ्या गौतमी पाटील हीच्याविरुद्ध आयोजकांनीच गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बार्शी महोत्सवातील तिचा लावणीचा शो ऐन वेळेवर रद्द करावा लागल्याची माहिती आहे.
पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हा कार्यक्रम कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी शहर पोलिसांत १६ मे रोजी होणाऱ्या लावणी महोत्सवास सशुल्क पोलिस बंदोबस्त मिळण्यास अर्ज केलेला होता.
पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, महावितरण कार्यालयाचे वीजपुरवठा मंजुरीचे प्रमाणपत्र, पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कर्मचारी नियुक्ती प्रमाणपत्र, अग्निशामक यंत्रणेचे व अॅम्ब्युलन्स व वैद्यकीय सुविधा प्रमाणपत्र, या सर्व बाबींची पूर्तता केल्यास व पोलिस बंदोबस्त यांचे शुल्क भरल्यानंतर पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असे त्यांना पत्राद्वारे पोलिसांनी कळविले होते.
परंतु यातील कोणतीच पूर्तता न करता तसेच कोणतीही परवानगी न घेता त्यांनी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजनासाठी पोलीस परवानगी न घेतल्यामुळे, तसेच वेळेची मर्यादा न पाळल्याप्रमाणे पोलिसांनी कार्यक्रम सुरू असलेल्याठिकाणी जाऊन शो बंद करण्यास भाग पाडलं. त्यामुळे, बार्शीकरांना गौतमीच्या केवळ एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले.
Dancer Gautami Patil Barshi FIR Booked