नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ६ सप्टेंबर अखेर ९५.०७ टक्के साठा आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे सर्व धरण भरले असले तरी नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणाचा साठा मात्र शून्य आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ९५.५४ टक्के तर समुहात ९६.४२ टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, नांदूरममध्यमेश्वर, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज हे धरण ओव्हरप्लो झाली आहे. तर इतर धरणे जवळपास ९० ते ९५ टक्केच्या पुढे आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता बहुतांश धरणे भरली आहे. पण, नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणात आजही ० टक्के साठा आहे.