नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ३० सप्टेंबर अखेर ९९.०४ टक्के साठा आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे सर्व धरण भरले आहे. फक्त नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणात ५७.४७ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा १०० टक्के तर समुहात १०० टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, नांदूरममध्यमेश्वर, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपूंज हे धरण अगोदर ओव्हरप्लो झाली आहे. त्यानंतर इतर धरणातही आता ९९ टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता बहुतांश धरणे भरली आहे.