नाशिक – जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी समाधानकर पाऊस न झाल्याने शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये अवघा २८ टक्केच साठा आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस आला नाही तर पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षीही जुलै महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये २७ टक्के साठा होता. यंदा तो २८ टक्के आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली,वालदेवी,कडवा, नांदूरमध्यमेश्वर,हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, यंदा पावसाची मोठी प्रतिक्षा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा २८ टक्के तर समुहाचा २३ टक्के साठा आहे. अन्य धरणांचीही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
जिल्ह्यातील जलसाठा असा