नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये २४ टक्के साठा आहे. पावसाळयात गंगापूर, आळंदी,वाघाड, दारणा, भावली,वालदेवी,कडवा, नांदूरमध्यमेश्वर,हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, आता या धरणाचाही साठा कमी झाला आहे. गंगापूर धरणाचा साठा २८ टक्के तर समुहात २४ टक्के साठा आता आहे.