नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ९६ टक्के साठा आहे. गंगापूर, आळंदी,वाघाड,दारणा, भावली,वालदेवी,कडवा, नांदूरमध्यमेश्वर,हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर इतरही धऱणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ९७ टक्के भरले असून समुहात ९८ टक्के साठा आहे.