नाशिक – गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने दुपारी १२ वाजता ३ हजार क्युसेकने विसर्ग करणार असल्याची माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. सकाळी २ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर आता त्यात वाढ करण्यात आली आहे. गंगापूर धरण ओव्हरप्लो झाले आहे. तर गंगापूर धरण समुहातील धरणही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे.