नाशिक – गंगापूर धरणातून आज सकाळी ९ वाजता वाजता २५०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. काल सांयकाळी १५०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. आज त्यात वाढ करण्यात आली. या विसर्गामुळे जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याची पातळी दुपारपर्यंत वाढणार आहे. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून ८०० क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आला. कडवा धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे काल सांयकाळी ६ वाजता २२०० क्यूसेसने विसर्ग करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ७२ टक्के साठा आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज, आळंदी, नागासाक्या, कडवा ही सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहे.