नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ७२ टक्के साठा आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज, आळंदी, नागासाक्या, कडवा ही सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर नांदुरमधमेश्वर धरणात ९३ टक्के, दारणा ९८ टक्के, चणकापूर ९४ टक्के, पुनद ९६ टक्के साठा आहे. १३ हून अधिक धरणात ५० टक्के पेक्षा जास्त साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९७ टक्के आहेत. तर समुहात ९० टक्के साठा आहे. भोजापूर व तिसगाव धरणात कमी साठा आहे.