नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ६१ टक्के साठा असून तो गेल्या काही दिवसापासून स्थिर आहे.. भावली, वालदेवी, हरणबारी , माणिकपुंज ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तर नांदूरमधमेश्वर ९८ टक्के आहे. तर १२ हून अधिक धरणात ५० टक्के साठा तर आठ धरणाचा साठा २५ टक्केहून अधिक आहे. गंगापूर धरणाचा साठा ८६ टक्के आहेत. तर समुहात ७८ टक्के साठा आहे . नागासाक्या, भोजापूर,. पुणेगाव व तिसगाव धरणात मात्र सर्वात कमी साठा असून तो चिंता वाढवणारा आहे.