इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बौद्ध नेते दलाई लामा यांनी एका सार्वजनिक मंचावर एका लहान मुलाचे चुंबन घेतल्याबद्दल माफी मागितली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका मुलाच्या ओठांवर चुंबन घेताना दिसत आहे. या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर दलाई लामा यांच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दलाई लामा यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक लहान मूल दलाई लामांना मिठी मारण्याची विनंती करताना दिसत आहे. या प्रकरणात, धार्मिक नेत्याने आपल्या वक्तव्यामुळे झालेल्या हानीबद्दल मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची तसेच जगभरातील त्याच्या सर्व मित्रांची माफी मागायची आहे. दलाई लामा हे अनेकदा निष्पापपणे आणि खेळकरपणे लोकांसोबत भेटतात. ते लोकांसोबत मजा-मस्ती करत असतात, अगदी सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यांसमोरही ते लोकांना खेळकरपणे वागतात. त्यांना या घटनेचा पश्चाताप होत आहे.’
https://twitter.com/DalaiLama/status/1645312490597937152?s=20
बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी एका बालकाच्या ओठांवर चुंबन घेतल्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जगातून त्यांच्या या कृत्याचा निषेध नोंदविला जात आहे. सर्वच धर्मातील लोकांकडून याबद्दल रोष व्यक्त होत आहे.
दलाई लामा यांनी एका बालकाच्या ओठांवर चुंबन घेतले आणि त्यानंतर त्याला आपली जीभ चोखण्याची विनंती केली. हे करतानाचा त्यांचा व्हिडियो ट्विटरवर व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडियो सोशल मिडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात यावर टिका करणारे आणि त्याच्या बाजुने बोलणारेही लोक आहेत. काहींनी ही कृती अत्यंत लाजीरवाणी असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी ही तिबेटची संस्कृती असल्याचे म्हटले आहे.
एकाने बीबीसीच्या एका लेखाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘तिबेटमध्ये जीभ बाहेर काढणे ही एक प्रथा आहे. ही परंपरा नवव्या शतकाची आहे. लांग डार्मा नावाचा एक कुप्रसिद्ध राजा होता. तो त्याच्या त्याच्या काळ्या जिभेसाठी ओळखला जायचा. आम्ही त्याचा पुनर्जन्म नसल्याचे दाखवण्यासाठी तिबेटमधील लोक त्यांच्या जिभा बाहेर काढतात,’
अर्थात अशा प्रकारे वादात अडकण्याची दलाई लामा यांची पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये दलाई लामा यांनी ‘जर एखादी महिला दलाई लामांकडे आली तर ती अधिक आकर्षक असली पाहिजे,’ असे एका ब्रिटिश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर जगभरातून टीका झाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
भीतीदायक, घृणास्पद… तरीही
दलाई लामा यांच्या या कृत्यावर भीतीदायक, घृणास्पद, निंदनीय अश्या प्रतिक्रिया आल्या असल्या तरीही काहींनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काहीच नसल्याचे म्हटले आहे. ज्या अर्थी आजूबाजूच्या लोकांनी किंचितही आश्चर्य किंवा संताप व्यक्त केला नाही त्या अर्थी दलाई लामा यांची कृती आक्षेपार्ह नसावी. हा तिबेटी संस्कृतीचा भाग असू शकतो व कदाचित याचे धार्मिक महत्त्व असू शकते. अन्यथा दलाई लामा असे करण्याचे काहीच कारण नाही, असे त्याने म्हटले आहे.
https://twitter.com/woshizhangxiaob/status/1644754568457371648?s=20
Dalai Lama Trolled Kiss Video Viral Apologies