इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी स्वत:चा उत्तराधिकारी नेमला आहे. आठ वर्षीय अमेरिकी मंगोलियाई मुलाला त्यांनी स्वत:चा वारसदार घोषित केले असून दलामा लामा यांच्यानंतर कोण या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चीनचा तिबेटवर डोळा आहे. त्यातच चीनला टक्कर देणारे बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांच्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यात चीन ढवळाढवळ करत होता. असे असताना दलाई लामांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली होती. यावेळी चीन मंगोलियावर नाराज झाला होता.
चीन-मंगोलियन संबंधांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे चिनी सरकारने म्हटले होते. तेव्हाच लामा यांनी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा यांचा मंगोलियात पुनर्जन्म झाल्याचे म्हटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. आता निवडलेला मुलगा हा अगुईडाई आणि अचिल्टाई अल्तानार या जुळ्या मुलांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म मंगोलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार हा मुलगा जुळ्या मुलांपैकी एक आहे. खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म झाल्याचे लामा यांनी म्हटले आहे. बौद्ध धर्मात धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिले जाते. हिमाचल प्रदेश येथे धार्मिक नेत्याचा पुनर्जन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Dalai Lama Appointed 8 Year Old boy for New Lama